शेगावात आई शाकंभरी प्रकट दिन हर्षोल्हासात

shegaon

शेगाव प्रतिनिधी । शहरातील संत नगरीमधील बालाजी मंदिरात आई शाकंभरी प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कु. कार्तिक वर्मा व सोनल अवस्थी यांच्या सुमधुर वाणीत मंगल पाठ पार पडला.

यावेळी आई शाकंभरीच्या प्रतिमेला भाजीपाल्याने सजवून विराजमान करण्यात आले होते. या उत्सवामध्ये संत नगरीतील मंगलपाठ प्रवाह कु.कार्तिक वर्मा व कुमारी सोनल अवस्थी यांनी आपल्या सुमधुर आवाजात आई शाकंभरीची संपूर्ण लीला विस्तृत स्वरूपात भक्तांसमोर मांडली. या प्रकट दिन महोत्सवात शाकंभरी परीवारातील सदस्य सहभागी झाला असून गजरा उत्सव, मेहंदी उत्सव अशा विविध प्रकारचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

Protected Content