व्हॉटसअ‍ॅपवर भाजपाची पकड-राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली । अलीकडेच फेसबुक हे भाजप धार्जिणे असल्याचा आरोप केल्यानंतर आता राहूल गांधी यांनी व्हाटसअ‍ॅपवर भाजपची पकड असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या भाजपाबद्दलच्या भूमिकेवरून वादंग निर्माण झालं होतं. हे वाद अजूनही संपलेले नाहीत. त्यापाठोपाठ आता व्हॉट्सअ‍ॅपवरून राहुल गांधी यांनी भाजपावर अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मासिकातील एका लेखाच्या आधारे गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधी यांनी टाइम मासिकातील वृत्तांचा हवाला देत मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ४० कोटी भारतीयांकडून वापरलं जाणार्‍या व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी टाइममधील लेख ट्विट करत म्हटलं आहे की,अमेरिकेच्या टाइम मासिकानं व्हाटसअ‍ॅप आणि भाजपातील संबंधाचा पर्दाफाश केला आहे. ४० कोटी भारतीय वापरत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचा ऑनलाइन व्यवहारांसाठी वापर करण्याची व्हॉट्सअ‍ॅपची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना मोदी सरकारची परवानगी आवश्यक आहे. अशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉटसअ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकवरही असाच आरोप झाला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या भाजपावर कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला होता. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणार्‍या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केल्याचं या वृत्तात म्हटलं गेलं होतं.

फेसबुकने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निष्पक्ष असल्याचा दावा केला होता. यानंतर आता व्हाटसअ‍ॅच्या भूमिकेवरून राहूल गांधी यांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content