भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्यांतर्फे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन

 

रावेर, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने हिंदु देवतांची मंदिर उघडावेत यासाठी दार उघड उद्धवा दार उघड अशी हाक श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारकडून देवस्थाने भक्तांसाठी खुले करण्यासाठी परिपत्रक या पुर्वीच काढले आहे व त्यानुसार देशभरातील देवस्थाने खुली करण्यात आली आहे. परंतु, राज्यातील आघाडी सरकारने त्यावर कुठल्याही कार्यवाही केले नाही व भक्तांसाठी मंदिरे खुले केली नसल्याने कुंभकर्णपेक्षा गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार इशारा देण्यासाठी राज्यभर दार उघडा उध्ववा दार उघड अशी हाक देवून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

तसेच रावेर येथे भाजपातर्फे आंदोलन केले व धुळे येथे अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना फि माफीचे निवेदन देतांना पालकमंत्र्या समोर पोलिसांनी विद्यार्थीनवर केलेल्या अमानुष लाठी हल्यांचा निषेध सुध्दा करण्यात आला. यासंबंधी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.

याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासुरकर , जि. उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प.स.सभापती जितेंद्र पाटील, कु.उ.बा.समिती सभापती श्रीकांत महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, प.स.उपभापती.जुम्मा तडवी, गटनेते प.स. पी.के.महाजन, जि.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, यु.मो.ता.अध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस यु.मो.खेमचंद्र धांडे, प.स.सदस्य हरलाल कोळी, संदिप सावळे, माजी अध्यक्ष मनोज श्रावक, सरपंच सिंगत प्रमोद पाटील, दुर्गादास पाटील, नगिनदास चौधरी, वसंत महाजन, माधव चौधरी, पंकज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content