शतायु कुळकर्णी याची विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शतायु संदीप कुळकर्णी याची १६ वर्षा खालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झालेली आहे. तो  जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल  या शाळेचा विद्यार्थी आहे.

 

नुकत्याच बी.सी.सी.आय. अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळतांना शतायु कूळकर्णी ने ५ सामन्यात २२ बळी घेतले. निर्णायक क्षणी हे बळी घेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली असुन तो आता पुढील सामने खेळण्यासाठी चैन्नई येथे रवाना होणार असून त्याच्या या कामगिरीचा शाळेकडून त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी शतायुचे क्रिडा मार्गदर्शक सूर्यकांत देवराज व निवृत्ती तांदळे यांचा ही सन्मान करण्यात आला. त्यासोबतच यावेळी शतायु ची आई सायली कुळकर्णी यांचा देखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटीचे सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडिया तसेच विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील सी.ई.ओ. अतुल चित्ते हे उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचलन स्वरूप पाटील यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content