Home Uncategorized खळबळजनक : उत्तर प्रदेशात प्रेमी युगुलाला जिवंत जाळले !

खळबळजनक : उत्तर प्रदेशात प्रेमी युगुलाला जिवंत जाळले !


बांदा ( वृत्तसंस्था) प्रेमी युगुलाला खोलीत बंद करून तरुणीच्या भावाने कुटुंबीयांच्या मदतीने जिवंत जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे.

या संदर्भात अधिक असे की, तरुणीला भेटण्यासाठी तिच्याच गावातील एक तरुण रात्री उशिरा तिच्या घरी आला होता. दोघेही घरात बसून बोलत होते. तेवढ्यात याची माहिती या तरुणीच्या भावाला समजली. त्यानंतर संतप्त झालेल्या संबंधित तरुणीच्या भावाने या प्रेमी युगुलाला या घराच्या खोलीत बंद केले आणि या तरुणीचा भाऊ घराच्या छप्परावर चढला आणि त्याने रॉकेल ओतून घराला आग लावली. आगीत अडकलेल्या प्रेमी युगुलाचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी घराकडे धाव घेतली आणि दोघांनाही घराबाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. प्रेमी युगुलाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मृत तरुणीच्या भावाला अटक करण्यात आली असून, वडिलांसह अन्य आरोपी फरार आहे.


Protected Content

Play sound