मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवीन नायब राज्यपाल

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मिरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जी. सी. मुर्मू यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती जाहीर केली.

राष्ट्रपती भवनाने आज सकाळी एका निवेदनाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जी.सी. मुर्मू यांची जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपुर्द केला होता. हा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांच्यावर नायब राज्यपालपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार मुर्मू यांच्याकडे कॅगची महत्वपूर्ण जबाबदारी सुपुर्द करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Protected Content