कोविड हॉस्पीटलला भीषण आग; ८ रूग्णांचा मृत्यू

अहमदाबाद वृत्तसंस्था । येथील कोविड हॉस्पीटलला लागलेल्या भीषण आगीत आठ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदाबाद येथील श्रेय हॉस्पीटलला आज पहाटे आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू झाला असून ते सर्व कोरोना बाधीत असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नवरंगपुरा भागातील श्रेय हॉस्पीटल हे शहरातील खासगी रूग्णालय असून याला शासनाने अधिग्रहीत करून कोविड हॉस्पीटलमध्ये परिवर्तीत केले आहे. येथे शहरातील कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत.

आज पहाटे हॉस्पीटलच्या आयसीयू युनिटमध्ये अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आग लागल्यानंतर कोरोनावर उपचार घेत असलेल्या ३५ रुग्णांना तातडीने दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान, या आगीत अजून काही जण भाजले गेल्याची माहिती असून यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content