श्रीराम मंदिराचे भूमिपुजन दिपावली सारखे साजरे करा – अमोल शिंदे

पाचोरा प्रतिनिधी । श्री राम मंदिराचे भूमिपूजन हा ऐतिहासीक दिवस असून याला दीपोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे.

अयोध्या येथे उद्या दि. ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असुन त्या पार्श्‍वभूमीवर हा दिवस प्रभु श्रीराम दिपावली म्हणून साजरा करण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेला एका पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून आयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर उभा रहावं ही तमाम भारतीयांची इच्छा होती.मंदिर निर्माण बाबत भारतीय जनता पार्टीने दिलेले अभिवचन आज पूर्णत्वास येत असल्याचा मला अभिमान आहे,जगभरातील तमाम जनतेची ही इच्छा आता प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होईल. या भूमिपूजन सोहळ्याचे प्रक्षेपण जगभरात होणार असल्याने हा नेत्रदीपक सोहळा सर्वांनी आवर्जून बघावा. ह्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य तुम्हाला, मला,आपण सर्वांना मिळाल्याने खरोखरच आपण भाग्यवान आहोत.

अमोल शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, सर्व माता भगिनींनी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी घरात गोड-धोड स्वयंपाक करून आपल्या देवघरातील ईष्टदेवतांना नैवैद्य दाखवावा व प्रभू रामचंद्र यांचे स्मरण करून मनोभावे प्रार्थना करावी तसेच अंगणात सडा , रांगोळी काढून सायंकाळी घराबाहेर किमान ५ दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा. ज्यांच्या ज्यांच्या घरात प्रभू श्रीरामांची प्रतिमा असेल त्यांनी प्रतिमा पूजन करून नैवेद्य दाखवावा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे.

Protected Content