पोलीस दलाच्या स्केटिंग स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दल व शासन मान्यताप्राप्त स्वयंसिद्धा बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वेल्फेअर जळगाव जिल्हा पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी स्केटिंगच्या मैदानावर पहिली विभागीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक गृह संदीप गावित व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,वेल्फेअर पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, स्वयंसिद्ध बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल वाघ यांच्या उपस्थितीत स्केटिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.

स्पर्धेला जळगाव जिल्ह्यातील स्केटिंग प्रशिक्षण वर्ग, शाळा व विविध प्रशिक्षण केंद्रातून एकूण ११५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला यात जास्तीत जास्त खेळाडू आणून मेडल मिळवणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांना व शाळांना चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले त्यात चॅम्पियन ट्रॉफी प्रथम क्रमांक चावरा इंटरनॅशनल स्कूल तर द्वितीय क्रमांक ऑक्सफर्ड स्कूल आव्हाने या शाळेने घेतली तसेच तृतीय क्रमांक चॅम्पियन ट्रॉफी एकलव्य स्केटिंग प्रशिक्षण वर्ग खेळाडूंनी मिळवली.

स्वयंसिध्दा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल वाघ यांनी पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम क्रीडा स्पर्धा व स्केटिंग स्पर्धेच्या आयोजनाबद्दल स्वयंसिद्धा बहुउद्देशीय संस्थेला संधी दिली म्हणून पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी आपल्या मनोगतात उपस्थित पालकवर्ग यांनी आपापल्या मुलांना त्यांचे हातात मोबाईल न देता स्केटिंग चे किट देऊन अतिशय उत्कृष्ट काम केल्याने पालकवर्गाचे अभिनंदन केले तसेच खेळाडूंनी जिद्दीने खेळ खेळावे व स्पर्धेत न हारता जिद्दीने यशाकडे वाटचाल करावी असे स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांनी केले.सर्व स्पर्धकांना पोलीस अधीक्षक जळगाव मा.एम. राज. कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलिस अधीक्षक जळगाव भाग संदीप गावित ,राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, वेल्फेअर प्रभारी पोलीस अधिकारी रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या तसेच स्पर्धेचे तांत्रिक जबाबदारी महिला पोलीस प्रशिक्षक स्केटिंग जागृती काळे, महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/जंजाळे, राजेंद्र जंजाळे ,प्राजक्ता सोनवणे, उज्वला कासार ,वैष्णवी चौधरी ,धनश्री सोनवणे, स्वीटी गायकवाड आदींनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content