पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय स्तरावारील विजेत्या खेळाडूंचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा पोलीस दल पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या २९ खेळाडूंना राष्ट्रीयस्तरीय स्केटिंग स्पर्धेत विजय मिळवलेल्या खेळाडूंना पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

 

नेहरू युवा केंद्र औरंगाबाद स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स व ‘फा हायान कराटे असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे व २ डिसेंबर २०२१ ते ४ डिसेंबर गोवा येथे छत्रपती चषक राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा राष्ट्रीयस्तर असून यामध्ये भारतातून विविध राज्यातील एकूण ७०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या २९ खेळाडूंनी देखील औरंगाबाद व गोवा सहभाग नोंदविला होता. वयोगट १० ते १९ व त्यावरील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत मिळवलेल्या पारितोषिक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम दि. २७ डिसेंबर रोजी पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी स्वातंत्र चौक येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचे उपस्थित प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या हस्ते पारितोषिक प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी खेळाडू हा मैदानावर चांगला दिसतो, मुलांनी खेळाकडे वळणे आणि खेळातूनच आपल्या देशाची प्रगती होईल अशी आशा व्यक्त करत पोलीस प्रशासनाच्या स्पोर्ट्स अकॅडमीचा लाभ घेऊन पुढे जावे असे आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनोज पाटील यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस वेल्फेअरचे पी.आय. अंबादास मोरे, रावसाहेब गायकवाड, पप्पू देसले आदी उपस्थित होते. पोलिस स्पोर्ट्स अकॅडमी कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम-जंजाळे स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे-महाजन, प्रशिक्षण सहाय्यक प्रशिक्षक प्राजक्ता सोनवणे, अनंत सोनवणे, स्वीटी गायकवाड आदी उपस्थित होते.
कराटे विजयी खेळाडू
कौसुभ जंजाळे, चिन्मय लापसिया, पारस बालानी, पूर्वेश विधाते, राम जाधव, श्वेता धमके, पलक मिश्रा, प्रतिभा कापुरे, अनुष्का तिवारी, आस्था तिवारी, चैताली पाटील, गार्गी सन्ननसे, यश सन्ननसे, स्वरूप पाटील, धिरेंद्र पाटील, निषाद सोनोणे, वेदांत हिवराळे, स्मित मिश्रा, ऋग्वेद देशमुख.

 

स्केटिंग स्पर्धेतील विजयी खेळाडू
बुऱ्हानउद्दीन दाऊदी, पूर्वा राऊल,सार्थक महाजन,स्वरूप पाटील,तेजस्विनी सोनवणे,ललित जाधव,मानसी चौधरी,तिष्य उबाळे,साहिल तडवी.

Protected Content