शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला चढविला- रोहिणी खडसे (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर हल्ला चढविला असल्याचा आरोप जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या राहिणी खडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा थरारक घटनाक्रम आज मंगळवार २८ डिसेंबर सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितला. त्या म्हणाल्या की, मी सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या कारने येत असताना अचानक त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कारमध्ये यावेळी त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकाने आमच्या कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला.   हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. हल्ला केल्या नंतर थोड्या वेळातच संशयित हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला असल्याच आरोप रोहिणी खडसे खेवलकर यांनी केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!