प्लॉटचे पैशांवरून महिलेसह भावाला तिघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्लॉट विक्रीचे पैसे दिले नाही म्हणून महिलेसह तिच्या लहान भावाला शिवीगाळ करून चाकूने वार करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शबाना शेख सलीम (वय-३५) रा. न्यू ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांनी त्यांचा प्लॉ‍ट विक्री केला होता. याचे पैसे शरिफ शेख याला मागितले असता याचा राग येवून गुरूवारी १९ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास  महिलेसह तिचा भाऊ नईम शेख यांना शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केले. तसचे आसीफ शेख आणि अहमद शेख (पुर्ण नाव माहित नाही) यांनी नईमला मारहाण करून  डोक्याला दगड मारून दुखापत केली.

याप्रकरणी शबाना शेख सलीम यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २० मे रोजी संशयित आरोपी शरिफ शेख, आसिफ शेख आणि अहमद शेख  (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.

 

Protected Content