गच्चीवरून वायर टाकल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात ईलेक्ट्रिक तारांवर वायर टाकण्याच्या कारणाव्यन दोन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद जहुरअली कमरअली (वय-४४) रा. बिल्डींग नं. १८, पिंप्राळा हुडको जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कलरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शकील शेख हुसेन यांच्या गच्चीवरून त्यांनी ईलक्ट्रिक तारांवर आकोडा टाकून वायर नेली होती. यामुळे झालेल्या वादातून सैय्यद जहुरअरली कमरअली आणि त्यांचा पुतण्या फरहान परवे शेख यांना शकील शेख हुसेन आणि आलमगीर शेख हुसेन यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर एकान कटरने वार करून सैय्यद जहुलअली यांना दुखापत केली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत सैय्यद जहूरअली कमरअली यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २० मे रोजी दुपारी संशयित आरोपी  शकील शेख हुसेन आणि आलमगीर शेख हुसेन यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनमोल पटेल करीत आहे.

 

Protected Content