हिंगोणा प्रा.आ. केंद्राचे आरोग्य सभापतींकडून आरोग्यसेवेचे कौतूक

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जि.प. आरोग्य सभापतींनी आज हिंगोणा प्राथामिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता यावेळी आरोग्यसेवेचे कौतूक केले. तर आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या व अडचणीबाबत व्यथा मांडल्यात.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली असून या काळात ग्रामीण क्षेत्रातील परिसरात आरोग्य सेवादेणे अत्यंत महत्त्वाची असून या दृष्टिकोनातून जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी अचानक यावल तालुक्यातील हिंगोणा या गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देऊन त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी कशा पद्धतीने या संकटासमई नागरिकांना कशाप्रकारे आरोग्य सेवा देत आहे. याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

हिंगोणा तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता त्याठिकाणी हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी व त्यांचे सर्व सहकारी आरोग्य सेवक करोना विषाणूंच्या पार्श्वभूमी गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण कर्मचारीवर्ग अतिशय चौख व अतिशय शिस्तबद्ध मार्गाने आपल्या आरोग्याचे कर्तव्य बजावत असताना दिसून आले. यावेळी जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यतत्पर त्याबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज तडवी यांनी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्याशी चर्चा करताना ग्रामीण पातळीवर या कोरोना संकटाच्या काळात शासनाकडून अतिआवश्यक सामग्री व साहित्य उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे उपचार करताना आरोग्य विभागाला अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे, असे वैद्यकीय अधिकारी तडवी यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सभापती यांनी आपल्या अडचणी व सेवाभावनांचा आपण आदर करीत असून आपल्या अडचणी व मागण्या तात्काळ पूर्णा कशा करता येतील याविषयी आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी याप्रसंगी दिले.

Protected Content