संतापजनक : अवघ्या ३ हजारासाठी रुग्णालयाने महिलेचा मृतदेह तीन तास अडवून धरला

जळगाव, प्रतिनिधी । खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाने उपचाराचे पुर्ण पैसे भरल्याशिवाय महिलेचा मृतदेह ताब्यात देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली. अवघ्या 3 हजारासाठी महिलेचा मृतदेह तीन तास अडवून धरल्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

रावेर तालूक्‍यातील अंजुमनबी शेख नसरुद्दिन (वय-४८) या वृद्धेवर रावेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उच्च रक्तदाब आणि पक्षघात (पॅरेलेसीस)चा झटका आल्याने अनेक दिवसांपासुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. प्रकृती खालवल्याने त्यांना सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या श्रीपाद रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्त तपासणीत प्लेटलेट्‌स्‌ कमी असल्याने लॉकडाऊन काळात रक्त, प्लेटलेट्‌स आणि अत्यावश्‍यक वैद्यकीय सामृग्रीची अडचण होऊ नये म्हणुन डॉक्‍टरांनी त्यांना तातडीने जळगावी हलवण्याचा सल्ला दिला. कुटूंबीयांनी अंजुमनबी यांना घेवून संध्याकाळी ५.३० वाजता जळगाव गाठले. डॉ.सुनील चौधरी यांनी रेफर केलेल्या द्वारका हॉस्पीटलमध्ये त्यांना घेवुन आल्यानंतर येथी स्टाफने तपासणी करुन त्यांना डॉक्‍टरच आमचे आजारी असल्याचे कारण सांगुन रवाना केले. कोमात गेलेल्या बहीणीला घेवून तीन्ही भाऊ धाय मोकलून रडू लागले, जळगावातील दवाखान्यातुन त्यांना प्रताप नगरातील “क्रिपा’ क्रिटीकल केअर ऍण्ड ट्रॉमा सेंटरची चिठ्ठी मिळाल्याने तत्काळ ऍम्बुलन्सने त्यांना येथे दाखल करण्यात आले. रात्रभर उपचार झाल्यावर प्रकृती आणखी खालावून आज सकाळी दहा वाजता अंजुमन बी यांचा मृत्यु ओढवला. मात्र, रुग्णालयाचे बील देण्यास पुर्ण पैसे नसल्याने दवाखाना प्रशासनाने मृतदेह अडवून धरला.

Protected Content