जामनेरात पालिकेच्या शौचालयाच्या जागेत हातगाड्यांवर होतेय मांसविक्री

जामनेर प्रतिनिधी । शहरात पालिकेचे काही पडीक शौचालय आहेत. त्यात कत्तल करून हातगाड्यांवर मांसविक्री होत असल्याचा प्रकार गुरूवारी २ रोजी उघडकीस आला. याबाबत माहती मिळताच मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी पथक पाठवून विक्रेत्यांचे साहित्य जप्त करून कारवाईचा इशारा दिला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. मात्र शहरातील काही नागरीक त्याचा गैरफायदा घेत असून शासनाचे आदेश पायदळी तुडवीत आहेत. गुरूवारी जामनेर शहरात जणू आठवडे बाजारात भरला होता. तर आठवडे बाजार परिसरात नगरपालिकेच्या पडक्या व बंद अवस्थेत असलेले काही शौचालय आहेत. अशा शौचालयात कोंबड्या व प्राण्यांची कत्तल करून शहरातील काही नागरीक मांसाची हातगाड्यांवरून मुख्यरस्त्यावर विक्री करीत असल्याचा प्रकार धडकीस आला. याबाबत माहिती मिळताच मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी शहरात कोरोना प्रतिबंधक पथकास त्या भागात पाठवून अशा विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई केली असून यापुढे असा प्रकार उघडकीस आल्यास गुन्हा दाखल करण्याची सक्त ताकीद पालिकेतर्फे देण्यात आली.

प्रतिक्रिया
जामनेरातील आठवडे बाजाराच्या पाटीमागील बाजूस जुने बंदावस्थेतील शौचालय आहे. या शौचालयात कत्तल करून हातगाडीवर मांस विक्री केली जात होती. याबाबत माहती मिळताच पथक पाठवून सामान जप्त केले आहे. पुन्हा असा प्रकार निदर्शणास आल्यास गुन्हा दाखल केला करणार असल्याची सक्त ताकीद दिली आहे.
– राहूल पाटील, मुख्याधिकारी, जामनेर.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content