दापोरा येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा येथील ३० वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

विनोद सखाराम पाटील (वय-३०) रा. दापोरा ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रहिवाशी विनोद पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान अंतरावर खांबा क्रमांक ४०६/२७-१ दरम्यान युवकाने डाऊनलाईनवर जाणा-या  मालगाडी समोर स्वताला झोकून देत आत्महत्या केली.  आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दापोरा येथील पोलीस पाटील जितेंद्र गवंदे यांना खबर मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे. मयत हा अविवाहित असून आपल्या आई व भाऊसोबत राहतो.

 

Protected Content