रोहिणीत सेवा सहयोग संस्थेतर्फे गरजूंना स्कूल किटचे वाटप

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील रोहिणी येथे गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील ८० गरजू विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बीडीओ नंदकुमार वाळेकर हे उपस्थित होते.

तालुक्यात सेवा सहयोग संस्थेच्या (पुणे) वतीने व गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून निराधारांना मदतीचा हात दिले जाते. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील रोहिणी येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील ८० गरजू विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विलास भोई हे उपस्थित होते. त्याचबरोबर जितेंद्र महाजन, आत्माराम अहिरे, सुनील पगारे, सरपंच लताताई दावल माळी, उपसरपंच राजेंद्र वाघ, सेवा सहयोग प्रकल्पाचे राहूल राठोड, सीमा बोरसे (पिंप्राळा), पुष्पाबाई बागुल (कळमुड), केंद्रप्रमुख सतिष सपकाळे, माजी सरपंच बापूराव बोंडारे, भाऊसो, प्रसन्न डिघोळे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष गोकुळ सगळे, जगनभाऊ थोरे , उत्तम वाघ, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिंदी शाळेचे मुख्या. लक्ष्मण चव्हाण, तसेच ग्रामस्थ, पालक वर्ग, शा. व्य. समिती सदस्य, ग्रा.पंचायत सदस्य दोन्ही केंद्रातील २५ शाळेचे मुख्याध्यापक तसेच गोरख वाघ , शिक्षक पालक संघाचे भाऊसाहेब बांगर आदी उपस्थित होते.

यावेळी बीडीओ नंदकुमार वाळेकर व विलास भोई यांनी मार्गदर्शन केले. तर लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपुत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्राताई पाटील, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे समन्वयक सोमनाथ माळी यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांनी ग्रंथालय, कलादान केंद्र, डिजीटल क्लास रुम, प्रयोग शाळा, डिजीटल मुख्याध्यापक कार्यालय, इटरअँक्टी क्लॉस रुम, पाण्याची व्यवस्था, किचन गार्डन इतर शाळेतील विविध कामांची स्तुती मान्यवरांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्या. महेंद्रसिंग शिसोदे, उपशिक्षक भगवान बोरसे, ज्ञानेश्वर मोरे, संगिता थेटे, कविता वाघ, शरद शिरोडे, विलास गरुड, संदीप जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content