महिला बालकल्याण समिती नगरपरिषदतर्फे पाचोरा नगरीतील विधवा माता – भगिनी सन्मानित

 

पाचोरा, प्रतिनिधी  ।  परमेश्वराने आपल्याला दिलेले जीवन अनमोल आहे. जीवनाचा आनंद घ्या खचुन जावु नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जीवनसाथी गेल्याचे दुःख मोठं असतं. तुमच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमदार किशोर पाटील तथा नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्या मदतीने केला जाईल.  मूल  बाळांना मोठं करा त्यांना शिकवा आपल्या जीवनात सुख शांती येवो अशी इश्चरणी प्रार्थना करते असे उद्गार माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील काढले. त्या भडगाव रोडवरील महालपुरे मंगलकार्यालयात आयोजित महिला बालकल्याण समिती नगरपरिषदतर्फे आयोजित विधवा मातांचा सत्कार सोहळा प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा महिला संपर्क प्रमुख तथा मुंबई येथील नगरसेविका अंजनी नाईक म्हणाल्या की, आजचा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील अभिनव कार्यक्रम आहे. मला खूप आनंद झाला. पाचोरा नगरपरिषद महिला बालकल्याण समिती आयोजन तथा माजी नगराध्यक्षा सुनीता किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमास माझ्या मनापासून शुभेच्छा. स्त्रीशक्ती सृष्टीतील अद्वितीय आहे. राजमाता, कुंती, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, इंदिरा गांधी, सावित्री फुले, मदर टेरेसा, मीना उद्धव ठाकरे, प्रतिभा पाटील अशा कर्तृत्ववान श्रेष्ठ मातांचे आपण वारसदार आहोत. आपणही आपल्यातल्या शक्तींना, कर्तृत्वान श्रेष्ठ मातांचे  आपण वारसदार आहोत. आपणही आपल्यातल्या शक्तींना, गुणांना ओळखा. पती गेल्यामुळे कुंटुंबाचा संपूर्ण भार आपल्याला उचलावा  लागतो. हि फार मोठी गंभीर समस्या  आहे. आपत्ती संकट, दुःख येतात जातात. आपल्याला धीराने त्यांचा सामना करावयाचा आहे. खचू नका मूल शिकून मोठी होतील. चांगले दिवस नक्कीच येतील.  स्रिच्या सेवा, त्याग समर्थपणे नवनिर्मिती होत असते. आपल्यातील वास्तल्य प्रेम, ममता, स्नेह सदाचाराने सेवेतून, घराला घरपण येत.

आमदार किशोर पाटील तथा नगराध्यक्ष संजय गोहिल माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील, शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडी कार्यकर्ता आपणा सोबत आहे. आपल्या अडचणी, समस्या, प्रश्न त्यांना सांगा, भेटा ते नक्कीच सोडवतील. यावेळी वैशाली सूर्यवंशी, डॉ. अस्मिता पाटील, भारती पाटील, महानंदा पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, अर्चना पाटील आदींनी आपले विचार मांडले.

यावेळी नवनिर्वाचित उपनगरध्यक्ष प्रियंका पाटील यांचं सत्कार करण्यात आला. जय जवान माता वीर माता  भगिनीना व पाचोरा शहरातील विधवा माता भगिनींना साडी चोळी भेट देण्यात आली. मकर संकारतीच्या पर्वाचा संस्कार म्हणून “तीळ गुळ घ्या, गोड  गोड बोला” म्हणत तीळ गुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरिता मंत्री, अश्विनी भदाणे (अमळनेर ), अंजली नाईक – मुंबई, मंदा पाटील, उर्वशी गोहिल, सीमा पाटील, किरणताई पाटील, सुंनदा महाजन, उर्मिला शेळके, सुषमा पाटील, मालती हटकर, हजराबी तडवी, स्मिता बारवकर, संगीता  पगारे, मीना पाटील, रत्ना पाटील, बेबाताई पाटील, पद्माताई पाटील, रुपाली अमृतकर, प्रियंका पाटील,  पाटील, प्रीती सोनवणे, नर्मदा पाटील, कल्पना पाटील, सुनंदा पाटील, रंजन आमले, सिंधु पाटील, जया पवार, रेखा  राजपूत, लता वाघ तथा  जवानांच्या वीरपत्नी व पाचोरा शहरातील विधवा माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Protected Content