‘जागतिक तापमान वाढीचा वातावरणावर होणारा परिणाम’ या विषयावर कार्यशाळा

kce 1

जळगाव प्रतिनिधी । आजच्या जागतिक वातावरणात झालेला बदल आणि त्यामुळे वाढलेले तापमान हे जगापुढे मोठा प्रश्न बनलेला आहे त्यावर मात करण्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे असे डॉ. प्रज्ञा जंगले यांनी सांगितले. के.सी.ई. सोसायटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव आणि के सी ई सोसायटी शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने “जागतिक तापमान वाढीचा वातावरणावर होणारा परिणाम”या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

 

कार्यशाळेच्या समन्वयिका म्हणून डॉ. वंदना चौधरी यांनी कामकाज पहिले तसेच या कार्यशाळेचे उद्घाटक डॉ. प्रज्ञा जंगले (भूगोल विभाग प्रमुख) यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी जागातिक तापमान वाढ आणि जलसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच के.सी.ई.चे अध्यापक विद्यालयाचे प्रा. किसन पावरा यांनी जागतिक तापमान वाढ संकल्पना यावर मार्गदर्शन केले. प्रा. साधना झोपे, के. सी. ई. अध्यापक विद्यालय जळगाव यांनी हरीतगृह व परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रा.आर.सी. शिंगाणे, यांनी भूषविले तसेच सूत्र संचालन खगेश्वरी पाटील व पल्लवी क्षीरसागर यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षदा कोल्हटकर यांनी केले. कार्यशाळेला के.सी.ई. बी.एड. व बी.पी.एड. कॉलेज, एम.एड. व एम.पी.एड. कॉलेज, एम. जे. कॉलेज, एस. एस. मणियार लॉ कॉलेज, इंज‌िनिअरिग कॉलेज, पी.जी. कॉलेज, या महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content