जळगावात घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगारांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात विविध भागात घरफोडी करणारे अट्टल दोन गुन्हेगारांना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील १० लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहे. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

जळगाव शहरातील शहर, जिल्हा पेठ आणि तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने आज तालुका पोलीस ठाण्यात गुरनं १९९/२०२० दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपासाची सुत्रे हातात घेतली. गोपनिय माहितीच्या आधारे शहरातील अंजिंठा चौफुली येथे सापळा रचून संशयित आरोपी शेख नाजीम शेख रशिद (वय-२८) रा. मलिक नगर आणि त्याचा साला शेख अरबाज शेख मेहमुद (वय-२०, रा. अक्सा नगर) या दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघांच्या ताब्यातील सुमारे १० लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, यातील मुख्य आरोपी शेख नाजीम असून त्याने चोरी केलेला सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल साला शेख अरबाज याच्याघरात लपवून ठेवले होते. 

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ रवि नरवाडे, राजेश मेढे, सुनिल दामोदरे, संजय हिवरकर, संदीप पाटील, महेश महाजन, प्रविण मांडोळे, संजय चौधरी, किरण चौधरी, परेश महाजन, इंद्रीस पठाण आणि राजेद्र पवार यांनी ही कारवाई केली. दोन्ही संशयित आरोपीना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोहेकॉ रवि नरवाडे करीत आहे.

Protected Content