Home Cities जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष कोल्हे, महानगराध्यक्ष महाजन यांचा एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार

जिल्हा कार्याध्यक्ष कोल्हे, महानगराध्यक्ष महाजन यांचा एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार

0
50

 

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जळगाव येथे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नवनियुक्त झालेले अमोल कोल्हे व महानगराध्यक्ष पदी नियुक्त झालेले अतुल महाजन यांचा एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजसंघटन मजबुत करून पुढील समाजकार्य कसे करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडु) भोळे , माजी महानगराध्यक्ष निखिल रडे , मधूकर भंगाळे , प्रशांत बाणाईत , राकेश चौधरी, शुभम चिरमाडे व महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound