महामार्गाच्या विकासासाठी १६० कोटी रूपयांचा सुधारित डीपीआर : खा. उन्मेष पाटील (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गासाठी आपण नितीन गडकरी यांची भेट घेऊन १६० कोटी रूपयांचा सुधारित डीपीआर तयार केला असून याच्या माध्यमातून जनतेला भेडसावणार्‍या सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे अशी माहिती आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गात संदर्भात जळगावकरांच्या मनात अनेक प्रश्न होती. गेल्या काही र्षापासून यावर जळगावकर नागरिक आणि विविध संघटनेतर्फे आंदोलनेही झाली. मात्र सध्या चर्चेत असलेला प्रश्न हा आकाशवाणी चौकात असलेल्या सर्कलचं प्रमाण होय. याविषयी ‘नॅशनल हायवे ऑफ अथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी’ यांच्या पाहणीतून जळगावकर नागरिकांच्या अपेक्षानुसार त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

याविषयी बोलतांना खासदार उन्मेष पाटील म्हणाले, ”जळगावला बायपास, नॅशनल हायवे अनेक वर्षापूर्वी होणे अपेक्षित होते परंतू त्यात दिरंगाई झाली. २०१२ ला तयार झालेला हा डीपीआर त्यात अनेक उणीवा होत्या. त्या सगळ्या भरून काढत ७० कोटी रुपयांची निविदा या ठिकाणी निकालात काढण्यात आली. खोटे नगरपासून तो बांबोरीपर्यंत आणि इकडे कालिका मातेपासून तरसोदपर्यंत ए फोर फोर लाईनचा बायपास कनेक्ट करणारा बांबोरीचा ब्रिज, गिरणा ब्रिज, शिव कॉलनीचा ब्रिज हे तर झाले तर जळगावकरांना मोठा दिलासा मिळेल असं नितीन गडकरी यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ सूचना दिल्यानुसार १६० कोटी रुपयांचा डीपीआर मान्य करून त्याचा आराखडा सादर करून तो अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आहे. महिना दीड महिन्यात त्याच काम सुरु होईल.

आकाशवाणी चौकात असलेल्या सर्कलविषयी बोलतांना खासदार पाटील म्हणाले, सर्कलचा आकार कमी केल्यास ट्रॅफिक सुरळीत होण्यास मदत होईल. अपघात कमी होईल या भावनेचा आदर करत आज ‘नॅशनल हायवे ऑफ अथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी’ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आकाशवाणीच्या सर्कलची एकंदरीत १५ मीटर डायमीटर पेक्षा सर्कल जर कमी केलं तर त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढण्याची दाट शक्‍यता आहे म्हणून सर्कलच्या बाजूची रुंदी आहे १० मीटरऐवजी १५ मीटर करण्याच्या सूचना दिल्या. यासह ४० मीटरचा डिव्हायडर दिलेला आहे तो अजून १५ ते २० कमी करता येईल हाही विचार केला जातोय असं खासदार उमेश पाटील यांनी सांगितलं

जळगावच्या दृष्टीकोनातून

‘नॅशनल हायवे ऑफ अथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी’

आणि खासदार उन्मेष पाटील यांच्या बैठकीतील ठळक मुद्दे :-

७० कोटींचं काम संपवून १६० कोटीच्या डी.पी.आर. ला मान्यता घेणे…

अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौफुली, खोटे नगर येथे मेजर अंडरपास…

कालिकामाता सोबत इच्छा देवी, शिव कॉलोनी रेल्वे ब्रिजला लागून अंडरपास…

असे ६ मिनी अंडरपासमुळे जळगावकरांची दीर्घकाळाची समस्या सुटू शकेल….

फेसबुक व्हिडिओ लिंक

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1227032337809417

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/605683654096654

Protected Content