चोपडातील भगिनी मंडळाचे पथक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापुरकडे रवाना

chopada 2

चोपडा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने अनेक भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आता पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाची असलेली खरी गरज ओळखून येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे एक पथक मदतकार्यासाठी कोल्हापूर येथे आज रवाना झाले आहे.

या पथकात तेथे आरोग्यविषयक सुविधा व सेवा पुरवण्यासाठी नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित छात्र परिचारिका, पुराने प्रभावित क्षेत्रातील घरांमध्ये आवश्यक असणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रिशियन व फिटर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, समुदाय संघटन व व्यवस्थापनासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा या पथकात समावेश आहे. हे २० जणांचे पथक आपल्यासोबत औषधी, उपचाराचे साहित्य, वीज पुरवठा करण्यासाठीचे साहित्य घेऊन विशेष वाहनाने रवाना झाले आहेत. यासाठी संकुलातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या विशेष वाहनाला उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर हे वाहन कोल्हापूरकडे रवाना झाले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ५०० साड्या व कपड्यांच्या मदतीस रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागातील गरजू महिलांसाठी ५०० साड्या, आवश्यक कपडे, लहान मुलामुलींसाठी कपडे, शाळेचे दप्तर, रोख मदत, औषधे ई. मदत घेवून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह पप्पू स्वामी, डॉ. विजय पाटील, प्रमोद पाटील आदी कार्यकर्ते रवाना झाले आहेत. यासाठी शहरातील विविध व्यावसायिक व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला आहे. अनेकांनी स्वयंप्रेरणने कपडे आणून या पथकाजवळ दिले आहे.

यांची होती उपस्थितीत
यावेळी मा.वि. अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, माजी आ.जगदीशचंद्र वळवी, मा.शिक्षक आ.प्रा.दिलीप सोनवणे, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, तहसीलदार अनिल गावित, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, उपनगराध्यक्ष हुसेनखाँ पठाण, गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, कैलास सोनवणे, सरला शिरसाठ, माजी पं.स.सभापती, अॅड.डी.पी. पाटील, भारती बोरसे, गोकुळ पाटील, माजी जि.प.सदस्य धन:श्याम पाटील, माजी कृऊबा सभापती गोपाल पाटील, अॅड. रवींद्र जैन, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, पीपल्स बँक व्हा. चेअरमन प्रवीण गुजराथी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष धर्मेंद्र मगरे, डॉ. नरेंद्र शिरसाठ, कांचन राणे, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील प्रा. आशिष गुजराथी, विभाग प्रमुख अरुण संदानशिव, सुनील चौधरी, डॉ. संजय चौधरी, राजेंद्र महाजन, डॉ. ईश्वर सौंदाणकर, उदय ब्रम्हे, पिंजारी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अनेक मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल निकम यांनी केले.

Protected Content