निंबोल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

b

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील तांदलवाडी जवळ असलेले निंबोल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, यावेळी ६६ जणांनी रक्तदान केले. माधवराव गोडवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव यांनी रक्तसंकलन केले.
सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी पं.स सदस्य मोहन पाटील, उपसरपंच विजय पाटील, ग्रा.पं.सदस्य ईश्वर पाटील, डॉ.वैभव पाटील, राहूल पाटील यांसह अनेकांनी शिबिरात रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी सरदार वल्लभभाई फाऊंडेशन, माऊली बचत गट, ग्रामपंचायत निंबोल, ग्रामपंचायत अजंदे, ग्रामपंचायत नांदुरखेडा यांचे सहकार्य लाभले. निंबोल येथील रक्तदान शिबिराचे हे सततचे पाचवे वर्ष होते.

Protected Content