चोपडा तालुक्यातून वैजापूर घटनेबाबत ‘जनआक्रोश मोर्चा’

vaijapur

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वैजापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर मंगळवारी (दि.13) रोजी लैगिंक अत्याचार झाला. यासंदर्भात आज दि. 16 ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटल्यातील आरोपीवर अॅट्रासिटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करावा, एफ.आय.आर.मध्ये जीवे मारण्याचा तसेच अपहरणाचा प्रयत्न व तत्सम इतर कलमांचा समावेश करावा, गुन्हा उच्च अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी सुपूर्त करावा, याप्रकरणांसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, घटनेतील दोन्ही पिडीतांना मनोधर्य योजने अंतर्गत, समाजकल्याण विभागाकडून तात्काळ लाभ
मिळून द्यावा, घटनेतील दोन्ही पीडित मुलींना शिक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अश्या विविध मागण्याचे निवेदन
तहसीलदार अनील गावित यांना देण्यात आले.

मोर्चाला संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील ४७ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या डॉक्टर बारेला यांचा बहीण ज्योती पावरा यांनी सर्व पक्षीय नेत्यांची गर्दी पाहून मोर्चाला राजकीय रंग देऊ का आपण येथे चिमुकल्यांना न्याय मिळून देण्यासाठी आलो आहोत. पांढरे कपडे घालून कोणाचा शोक सभेत नाही आले आहेत. त्याचा ह्या वक्तव्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

काय म्हणाले अरुणभाई गुजराथी

प्रा.अरुणभाई गुजराथी चोपडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत कायद्यात जर फाशीची शिक्षा बसत नसेल तर आधी कायदा बदला आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या, डॉ. चंद्रकांत बरेला वैजापूर येथील पीडितांना न्याय मिळावा. आरोपी देवेंद्र भोई याला फाशीची शिक्षा व्हावी. मोर्चात आलेल्या सर्वांना आव्हान केले अफवेला बळी पडू नका, पीडित मुलीची प्रकृती गंभीर आहे. परंतु तिच्या जीवाला धोका नाही. तिच्यावर उपचार जळगाव येथे सुरू आहेत. त्या दोघ बहिणी लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, असे ते यावेळी म्हणाले.

यांचा होता सहभाग
जन आक्रोश मोर्चाची सुरुवात येथील शासकीय विश्राम गृहातून चोपडा बस स्टँड, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, शनी मंदिर, शहरातील मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील आदिवासी बांधव शहरातील सर्वपक्षीय नेते, भोई समाज, सर्व स्थरातून लहान मुले, महिला, पुरुष, सर्व राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी,
आणि सुज्ञ नागरिकांनी सहभाग नोंदवित, मोर्च्यात सुमारे 5 हजार पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला होता.

Protected Content