जिल्हा बँकेवर माजी आ. अरूण पाटील यांची निवड निश्चित

रावेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अरूणदादा पाटील यांना काँग्रेसचे  दोन्ही उमेदवारांनी जाहीर पाठींबा दिल्याने त्यांची जिल्हा बँकेवर संचालकपदी अरूण पाटील यांची निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.

 

दिवाळी नंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी भाजपाचे बहिष्कार टाकून सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनल यांची लढत आहे. दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. यात रावेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघासाठी मावळते संघालक नंदकिशोर महाजन , माजी आ.अरुण पाटील, जनाबाई महाजन, राजीव पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती.

त्यापैकी माघारीच्या दिवशी अरुण पाटील, जनाबाई महाजन व राजीव पाटील वगळता बाकीच्या उमेदवारांनी माघार घेतली होती. भाजपतर्फे नंदकिशोर महाजन व राष्ट्रवादीतर्फे अरुण पाटील हे सुरुवातीपासूनच इच्छुक असतांना हि जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची बनवत जनाबाई महाजन यांच्यासाठी सोडण्यास महाविकास आघाडीला सोडायला भाग पडले होते. त्याच वेळी काँग्रेसचे कट्टर समर्थक पक्षाचे व जिल्हा बँकेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजीव पाटील हे हि रिंगणात होते. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही राष्ट्रवादीचे नेते दखल घेत नाही असे लक्षात आल्यावर अरुण पाटील यांनी भाजपशी जवळीक साधली. व त्यात ते यशस्वीही झाले. राष्टवादीचे उमेदवार अखेर भाजपचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर झाले. या घटनेने तालुक्यातील पहिला राजकीय भूकंप झाला. तर काँग्रेसतर्फे आपले नाव निश्चित असताना काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केल्याने काँग्रेसच्या जनाबाई महाजन यांनी निवडणूक रिंगणातून अप्रत्यक्षरीत्या मगर घेत प्रतिस्पर्धी उमेदवार अरुण पाटील यांना स्वतःचा पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळे पुन्हा काँग्रेसला आणखी एक हादरा बसला.

त्यानंतर निवडणुक रिंगणात असलेले काँग्रेसचे समर्थक राजीव पाटील यांच्याशी काँग्रेसच्या पक्ष श्रेठींनी औपचारिकता म्हणून साधी विचारपूसही केली नाही. एकीकडे तालुक्यात काँग्रेस पक्ष लयाला जात असताना डॅमेज कंट्रोलचा साधा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी केला नाही. असा आरोप राजीव पाटील यांनी चौधरी यांच्यावर केला आहे. त्यामुळे पाटील यांनीही शुक्रवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. व त्यांनीही स्वतःचा पाठिंबा उमेदवार अरुण पाटील यांना जाहीर करीत काँग्रेसला व आमदार शिरीष चौधरी यांना पुन्हा जोरदार धक्का दिला आहे.

 

निवडणुक रिंगणात असलेले काँग्रेसचे समर्थक राजीव पाटील यांच्याशी काँग्रेसच्या पक्ष श्रेठींनी औपचारिकता म्हणून साधी विचारपूसही   काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी केला नाही, असा आरोप राजीव पाटील यांनी केला आहे. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांची निवडणुकीला पाठ व अरुण पाटील यांना दिलेला पाठिंबा यामुळे तालुक्यातून काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा व अस्तित्व लयाला लागली आहे.

Protected Content