त्यांच्या जीवाला धोका असल्यास सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही – शरद पवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज ठाकरे यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही, परंतु काही राष्ट्रीय प्रश्न आहेत. सामान्य माणसांचे काही प्रश्न त्रासदायक आहेत, त्यावरही बोलावे असे शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेवर भाष्य केले आहे.

राज्यात भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेता ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे.

तसेच राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर ते अयोध्येला जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. राज ठाकरे यांना राज्य सरकारची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. परंतु राज्य सरकार विरोधी राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याचा मनसेचा आरोप आहे. ज्या राज्यांमध्ये राष्ट्रवादीची क्षमता कमी आहे अशा राज्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परंतु देशात सांप्रदायिक विचार वाढ होणे हि चिंताजनक बाब आहे काही राष्ट्रीय प्रश्न आहेत. त्यावर ठाकरे यांनी बोलावे असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रसार माध्यमाना प्रतिक्रिया दिली

Protected Content