खंडेराव नगरात मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरी विठ्ठल नगर जवळील खंडेराव नगर भागात असलेल्या आझाद नगर भागात शनिवारी मुलीची छेड काढण्यावरून रात्री दोन गटात हाणामारी झाली. रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता, घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते.

शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात असलेल्या खंडेराव नगरातील आजाद नगर भागात आज शनिवारी दोन ऑक्टोबर रोजी बाजार असल्यामुळे बाजारात आलेल्या मुली छेडचाड केल्याच्या कारणावरून रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलीची छेड काढण्याच्या जाब विचारण्याच्या कारणावरुन कशामुळे गटाने पहिल्या गटाला मारहाण केल्यावरून हा वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही वेळातच दगडफेक करण्यात आली.

घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. यावादात वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कमेऱ्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे.  अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते या घटनेत एक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content