जळगावात ध्वजदिन निधी संकलनाचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ

web news

जळगाव, प्रतिनिधी । ध्वजदिन निधी 2019 संकलनाचा शुभारंभ शनिवार, 7 डिसेंबर, 2019 रोजी माजी सैनिक विश्रामगृह, मायादेवी मंदिरा जवळ, महाबळ रोड येथे दुपारी 12.00 वाजता प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ दिप प्रज्वलनाने करण्यात येवून शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. शहीद/सैनिकांच्या कुटुबियांचा सत्कार व महाराष्ट्र शासनाकडून गौरव पुरस्कार वितरण, ध्वजदिन निधी 2018 निधी संकलनाचे कामी उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय व निम शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिक/प्रशस्तीपत्र, माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप अशा विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वामन कदम हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ध्वजदिन निधी संकलनकामी नियुक्त कर्मचारी व जिल्ह्यातील माजी सैनिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content