इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरण

जळगाव, प्रतिनिधी | येथील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे इकरा युनानी मेडिकल कॉलेज येथे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी दिवसीय लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरणाचे उदघाटन इकरा शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले.

 

लसीकरण शिबिरात प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य इरफान इकबाल शेख यांनी युनानी मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या हस्ते कोरोनाची लस घेतली. महाविद्यालयातील काही विद्यार्थी व पालकांनी ही लस घेतली. यावेळी एजाज मलीक, अ. अजीज सालार, अमिन बादलीवाल, अ. रशीद शेख, जफर शेख, नबीदादा बागवान, प्रा. फरीदा लेहरी, प्रा.व्ही.टी पठाण, प्रा. अजीम शेख, प्रा. वसीम शेख, प्रा. डॉ. ईश्वर सोनगरे, रईस अमीर, सैय्यद मुख्तार, मिर्झा जाहिद आदी उपस्थित होते.

Protected Content