Home धर्म-समाज शाम गायकवाड यांची भिल समाज एकता संघटनेच्या ऊसतोड कामगार भडगाव तालुका अध्यक्षपदी...

शाम गायकवाड यांची भिल समाज एकता संघटनेच्या ऊसतोड कामगार भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड

0
6


भडगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भिल समाज एकता संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच संघटनेच्या कार्याचा तळागाळापर्यंत विस्तार करण्यासाठी आणि ऊसतोड कामगारांच्या हक्कांना न्याय मिळवून देण्यासाठी पिचर्डे येथील शाम गायकवाड यांची भिल समाज एकता संघटनेच्या ‘ऊसतोड कामगार भडगाव तालुका अध्यक्ष’पदी निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ सोनवणे यांच्या हस्ते शाम गायकवाड यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. समाजातील नागरिकांना शासकीय योजना, कायदेशीर हक्क आणि कल्याणकारी उपक्रमांची माहिती मिळवून देणे, तसेच समाजात शैक्षणिक व सामाजिक जागृती निर्माण करणे हा या नियुक्तीमागील मुख्य उद्देश आहे. नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्यासह सर्व आदिवासी क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

तालुक्यातील भिलवाड्या, आदिवासी पाडे व वाड्यांवर राहणाऱ्या समाजबांधवांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये बंधुभाव आणि एकता निर्माण करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित अध्यक्ष शाम गायकवाड यांच्यावर असणार आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या व भिल समाजाच्या संघटनात्मक कार्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष रविभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केला. तर मिळालेल्या जबाबदारीच्या बळावर समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा ठाम निर्धार शाम गायकवाड यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या निवडीबद्दल समाजबांधव व मित्रपरिवाराकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound