मुंबई (वृत्तसंस्था) वेळेवेळी स्वबळाची घोषणा करणाऱ्या शिवसेनेची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली मोठी खिल्ली उडवली जात आहे. प्रसिद्ध मराठी सिनेमा ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का? हा संवादाचे मिम तयार करून स्वबळावर लढणारे इथेच राहतात का?, अशी टिंगल शिवसेनेवर सोशल मीडियावर केली जात आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप १६४ जागांवर लढणार असून युतीमधील मित्रपक्षांना १८ जागा भाजपा स्वत:च्या कोट्यातून देणार आहे. तसेच शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावे लागल्याने शिवसेना युतीमधील छोटा भाऊ ठरला आहे. भाजप शिवसेना युती झाली असल्याने अनेकजण नाराज झाले आहेत, रडले आहेत, चिडले आहेत. नेटकऱ्यांनी देखील मीम्स आणि विनोदी व्हिडिओ व्हायरल करत शिवसेनेची खिल्ली उडवत आहेत.