नागपूर स्मार्ट सिटीच्या कामात कोणतीही अनियमितता नाही ; तुकाराम मुंढेंचे स्पष्टीकरण

नागपूर (वृत्तसंस्था) स्मार्ट सिटी सीईओ म्हणून कामात कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही, असा खुलासा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुढेंनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्याविरोधात केंद्र सरकारकडे केलेल्या तक्रारीनंतर तुकाराम मुंढेंनी खुलासा दिला आहे.

 

नागपूर स्मार्ट सिटी सीईओबाबत तुकाराम मुंढेंने आपले स्पष्टीकरण दिले आहे. नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन प्रवीणसिंह परदेशी यांनी मला सीईओ स्मार्ट सिटी नागपूरचा कार्यभार सांभाळण्यासाठी मोबाईलवर निर्देश दिले. स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडत आहे. तसेच याबाबतचे टेंडर प्रक्रिया रद्द करताना चेअरमन यांच्याशी चर्चा केली, असे तुकाराम मुंढे म्हणाले. या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकाशिवाय केवळ एकच चालू बिल देण्यात आले आहे. सदर बिल यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे व करार झालेल्या कंत्राटदराचे, त्यांनी केलेल्या कामाचेच आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही. सीईओ म्हणून काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, असा खुलासा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Protected Content