लवकरच महाराष्ट्राला ‘राज्यगीत’ मिळणार; ‘या’ गीताची निवड !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्याला लवकर राज्यगीत मिळणार असल्याची घोषणा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सर्वांच्या तोंडी बसलेले सुप्रसिध्द गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा म्हणून निवड करण्यास एकमत झाले आहे.

महाराष्ट्राच्या राज्यगीतासाठी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची निवड करण्यात आली आहे. कॅबिनेट राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना केली आहे.

“गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारे गीत असून गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे गीत साडेतीन मिनिटं वाजायचे. त्यामुळे आम्ही अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केला आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Protected Content