Home Cities पारोळा राष्ट्रवादीचे उपशहर प्रमुख मन्साराम चौधरी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादीचे उपशहर प्रमुख मन्साराम चौधरी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

0
75


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 6 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आझाद चौकामध्ये सोपान दादा कनेरकर यांचे व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित केले होते.
त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे उपशहर प्रमुख यांच्या मोठ्या थाटामाटा पक्षप्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारोळा उपशहर प्रमुख मन्साराम चौधरी यांनी आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासमयी त्यांचा आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावांचा विकासोचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक यांचेसह शहरवासी उपस्थित होते.


Protected Content

Play sound