बहुभाषक ब्राह्मण संघाचे ढोल-ताशा पथक ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । भगवान परशूराम जयंतीनिमित्त बहुभाषिक संघातर्फे ढोल-ताशा पथकाची निर्मिती करण्यात आली असून याचा शहरातील सागर पार्क मैदानावर सराव सुरू आहे.

बहुभाषक ब्राह्मण संघातर्फे भगवान परशूराम जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. या वर्षाचे विशेष आकर्षण म्हणजे जयंतीच्या दिवशी काढण्यात येणार्‍या शोभायात्रेमध्ये ढोल-ताशा पथक हे समाजबांधवांचेच असणार आहे. यासाठी खास पथक तयार करण्यात आले असून याची शहरातील सागर पार्क मैदानावर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यात युवक आणि युवतींचा सहभाग आहे. यामध्ये सुमारे ७० युवती आणि ५० युवकांचा समावेश असणार आहे. यासोबत लेझीम पथक असून शोभायात्रेमध्ये तलवारबाजी आणि लेझीम पथकाचाही समावेश असेल.

भगवान परशूराम जयंतीनिमित्त दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील जयंतीच्या दिवशी श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून आदल्या दिवशी मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. यात बहुभाषीक ब्राह्मण संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

पहा : बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या ढोल-ताशा पथकाबाबतचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content