सावदा ते हतनूर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे- ॲड. रोहिणी खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सावदा ते हतनूर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने गणेश भक्तांना व वाहन धारकांना त्रास सहन करावा लागणार आहे तरी या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

गणेश चतुर्थीला भक्तिभावाने स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे सात, दहा दिवसांनी विसर्जन करण्यात येते सावदा परिसरात स्थापना करण्यात आलेल्या गणरायांचे हतनूर येथे तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात येते.

यावेळी ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या, गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री. गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते दहा दिवस मनोभावे गणरायांची पुजा अर्चना केल्यानंतर अनंत चतुर्दशीला  ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाला सार्‍या दु:खांचा विनाश करून पुढील वर्षी बाप्पा लवकर ये या कामनेसह निरोप देण्यात येतो.

सावदा शहर व परीसरात स्थापना करण्यात आलेल्या  गणपती बाप्पांचे हतनूर येथील पुलावरुन तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात येते. सावदा ते हतनूर या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने गणेश भक्तांची वाट बिकट झाली आहे.

सतत पाऊस सुरू असल्याने डांबरी रस्ते उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. कधी वाहन खड्ड्यातून उसळून नियंत्रण सुटेल व अपघात होईल याचा नेम नाही. अशा खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनाला अपघात होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

त्यातच गणपती विसर्जन हे रात्रीच्या वेळेस होत असुन यावेळी मोठी गर्दी असते, अशा वेळी रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन सावदा ते हतनूर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून अनुचित घटना टाळावी व गणेश भक्तांची व प्रवाशांची वाट सुकर करावी असे आवाहन केले जात आहे.

Protected Content