आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Abdul Sattar Aurangabad

मुंबई (वृतसेवा )  लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी  बंडखोरी करून  औरंगाबादेत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भोकरदन येथे जाहीर सभेत केली.

 

काँग्रेस पक्षाला औरंगाबाद आणि जालना मतदारसंघातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका घेऊन औरंगाबाद आणि जालन्यात जाहीर सभा घेत त्यांनी काँग्रेसवर निशाना साधला होता. सत्तार यांनी बंडखोरी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार हे भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरु होती.  सत्तार हे औरंगाबादेतून लढण्यासाठी इच्छूक होते. परंतु, काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे सत्तार नाराज होते.

Add Comment

Protected Content