जिल्ह्यात १५  नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगणार

 
जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यात १४ नगरपालिकासह १ नगरपंचायतीच्या निवडणुकांची प्रभाग रचना प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आला आहे. यावर १७ ,मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. गेल्या पंचवार्षिकपेक्षा यावेळी प्रभाग किमान एक ते दोन ने वाढ झाली असून नगरसेवकांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. यावेळी मात्र थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष निवड न होता नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड केली जाणार आहे.

जिल्ह्यातील १९ नगरपालिका, नगरपंचायतीअसून त्यापैकी १५ नगरपालिकांची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. यातील बहुतांश मुदत गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वीच संपुष्टात आली आहे. परंतु गेल्या मार्च २०२० पासून संसर्ग प्रादुर्भाबामुळे या नगरपालिकांच्या निवडणुकीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून महिन्यात २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना प्रारूप आराखडा मागविण्यात आला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने विहित कार्यक्रमानुसार आज प्रभाग रचना प्रारूप आराखडा प्रसिद्धी देण्यात आली आहे.
प्रभागासह नगरसेवक देखील वाढणार
जिल्हयातील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त नगरसेवकांसह नगरसेवक निवडले जात होते, त्यात बदल होऊन आता नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडले जातील. जिल्ह्यात पाचोरा नगरपालिकेत पूर्वी १३ प्रभाग २६ नगरसेवक होते, आता १४ प्रभाग तर २८ नगरसेवक असतील, भडगाव -१० प्रभाग २१ नगरसेवक होते आता १२ प्रभाग २४ नगरसेवक, चोपडा पूर्वी १४ प्रभाग २८ नगरसेवक होते आता, १५ प्रभाग असून प्रत्येकी दोन व शेवटच्या एका प्रभागात तीन असे असे ३१ नगरसेवक असतील. पारोळा नगरपरिषदेत पूर्वी १२ प्रभाग २१ नगरसेवक व १ लोकनियुक्त असे २१ सदस्य होते. त्यात आता प्रभाग १२ असून नगरसेवक २४ असतील. एरंडोल आणि धरणगाव नगरपरिषदेत पूर्वी १० प्रभाग २० सदस्य होते तर आता ११ प्रभाग व २३ सदस्य असतील. सावदा आणि फैजपूर नगरपरिषदेत पूर्वी ८ प्रभाग १७ नगरसेवक होते. आता सावदा नगरपालिकेत १० प्रभाग व २० नगरसेवक तर फैजपूर नगरपालिकेत १० प्रभाग २१ नगरसेवक असतील.

नशिराबाद नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्येच नगरपंचायतीत होत असल्याचे जाहीर  झाले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यानुसार अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली होती.  त्यानुसार नशिराबाद नगरपंचायतीसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० प्रभागातून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. यावेळी थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीऐवजी नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवड केली जाणार आहे.

Protected Content