‘त्यांच्या’कडून निष्ठेचा चार गोष्टी शिका : राऊतांचा सल्ला

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला मारला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर या भेटींवरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मनोहर जोशी आणि लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक कडवट शिवसैनिक म्हणून कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहिले. त्यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अनेक वादळात, संकटात शिवसेनाप्रमुख, शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले. अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच यातून त्यांना प्रेरणा आणि बोध मिळेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, हा भातुकलीचा पोरखेळ सुरु आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहत नाही. तुम्ही तुमचा वेगळा पक्ष स्थापन करा आणि आपलं अस्तित्व दाखवा असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.

 

Protected Content