मालेगाव जिल्हा निर्मिती करा : दादा भुसे यांची मागणी

मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव दौर्‍यावर येत असतांना येथील आमदार दादा भुसे यांनी मालेगावला जिल्हा म्हणून घोषीत करावा अशी मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून राज्य दौर्‍यावर निघाले आहेत. यात ते आज सायंकाळी मालेगाव येथे येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, दादा भुसे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, गेल्या चार टर्मपासून आपण मालेगावचे प्रतिनिधीत्व करत आहोत. मालेगाव जिल्हा व्हावा अशी आपली आग्रही मागणी आहे. आपण हीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यानिमित्त करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार्‍या विभागीय आढावा बैठकीत यावर सकारात्मक निर्णय असल्याचा आशावाद दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.