बोदवड पंचायत समितीत कर्मचार्‍यांची दंडेलशाही ! सीइओंच्या आदेशाला केराची टोपली

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीतील कर्मचार्‍यांची दंडेलशाही सुरू असून हव्या त्या वेळेस येणे आणि पाहिजे तेव्हा निघून जाणे असे प्रकार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांनी वेळेचे पालन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. या संदर्भात त्यांनी २७ जुलै रोजी आदेश जारी केले आहेत. या जा. क्र .मु क अ /स्विस /आर आर/२२३/२०२२ या क्रमांकाच्या निर्देशात म्हटले आहे. की, प्रत्येक कर्मचार्‍याने वेळेचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे. यात कर्मचारी हा सकाळी ०९:४५ ते ०१:३० या कालावधीत कार्यालयात बसून कार्यालयीन कामकाज करेल. दुपारी दीड ते दोन ही भोजनाची वेळ असून यानंतर दोन ती तीन या काळात काम करावे. दुपारी ३ ते ४ या कालावधीत कार्यालयात कामसाठी इतर विभागामध्ये जायचं झाल्यास कार्यालयातील हालचाल नोंदवहीत नोंद करून वरिष्ठांचे परवानगी घेऊन जावे. ०४:०० ते ०६:१५ प्रत्येक कर्मचारी कार्यसनावर बसून कार्यालयीन कामकाज करतील. या व्यतिरिक्त इतरत्र जाणार नाही याची आपण दक्षता घ्यावी .जे कर्मचारी ठरवून दिलेल्या कामकाजाच्या वेळेचा भंग करीत असल्याचे दिसून आल्यास अशा कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे एक पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या निर्देशांना बोदवड पंचायत समितीतील कर्मचार्‍यांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. येथे कर्मचारी वेळेचे पालन करत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रकरणी जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दखल देण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

Protected Content