महाशिवरात्री निमित्त साई मंदिरात मेघस्नान, भजन-कीर्तनाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराच्या बळीराम पेठेतील साक्षात श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागृत साईबाबा मंदिरात महाशिवरात्री निमित्त श्री बाबांच्या मूर्तीस मेघस्नान, पूजा- अभिषेक व प्रसाद वाटप तसेच भजन,कीर्तन आणि शिर्डी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांचा सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे.

साक्षात श्री साईबाबा या जागेवर टांगेवल्याच्या वेशात आल्याचा साई चरित्रात उल्लेख आहे. महाशिवरात्री निमित्त साई बाबांच्या मूर्तीस मेघस्नान,अभिषेक-पूजा वनंतर प्रसाद वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साई दर्शनास सातत्याने पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांचा सपत्नीक सन्मान करण्यात येणार असून दुपारी महिला मंडळाच्या भजनाचा तसेच रात्री 8.30 वाजता डॉ.विशाखा जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शन व प्रसाद तसेच कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा मंडळ विश्वस्त मंडळाने केले आहे.

Protected Content