दोन बसेसची समोरासमोर धडक; 15 विद्यार्थी जखमी (व्हिडीओ)

Crime news1

जळगाव प्रतिनिधी । जळगावकडून धामणगावकडे जाणाऱ्या बसच्या चालकाने बैलजोडीला वाचवण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भरधाव बसला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात 15 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून जखमींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव डेपोची बस क्रमांक (एमएच 12 एएल 1428) नांद्राहुन-धामणगावकडे जळगावमार्गे जात होती. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास मामुराबाद फार्मसी महाविद्यालयाजवळ रस्त्यावर जाणाऱ्या बैलजोडीला वाचविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मध्यप्रदेशातील बस क्रमांक (एमपी 09, एफए 5581) ला जोरदार धडक दिली. या धडकेत जळगाव डेपोच्या बसच्याचालक साईडला धडक दिल्याने बसमधील 15 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमी झालेले 15 विद्यार्थी खालील प्रमाणे
मोहिनी वनराज सपकाळे वय- 19, हरेश्वर ज्ञानेश्वर सोनवणे रोहिणी अरुण सपकाळे वय- 18, माया शिवदास सोनवणे वय- 18, रोहित ज्ञानेश्वर न्यायदे वय-18, स्नेहा भास्कर भालेराव वय- 18, मिताली विजय सोनवणे वय- 18, सोनल गोपाल विसपुते वय- 17 सुपडु सपकाळे वय 17, धर्मेश संजय सपकाळे वय 18, अक्षय विजय भालेराव वय-18, अक्षय गोपाल भालेराव वय-18, विक्रम नथ्थु सपकाळे 18, दिनकर सुनिल सपकाळे 18, आणि वैभव घनश्याम खेडकर वय 18 सर्व रा. धामणगाव ता. जि.जळगाव यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सर्व जखमींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content