खासदार उदयनराजे भोसले करणार पंतप्रधानाच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

0Udayanraje Bhosale 35

 

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 14 सप्टेंबर भाजपमध्ये प्रवेश करत आहे, अशी माहिती स्वत: खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

 

ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्टर शेअर केले आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,असे भावनिक ट्वीट करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. परंतु श्री.पवार यांना देखील उदयनराजेचे मन वळविण्यात यश आले नाही.

Protected Content