जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या रोहिणी खडसे खेवलकर या प्रसंगी उपस्थित होत्या आणि त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील वन विभाग, पीक विमा, एमएसईबी संबंधित समस्या मांडल्या.

यामध्ये रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी थकीत विज बिलापोटी विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांचे आणि ग्रामिण भागातील पाणी पुरवठ्याचे विद्युत कनेक्शन कट केले असून विद्युत रोहित्रावर कनेक्शन असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आतापर्यंत थकीत असलेल्या सर्व विज बिल भरणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांना विद्युत रोहित्र उपलब्ध होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, रोहित्रावर कनेक्शन असलेल्या किती शेतकरी बांधवांनी विद्युत बिल भरले पाहिजे आणि मागील किती विज बिल भरले. तसेच मागील एक बिल भरले तरी शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र उपलब्ध व्हावे, याचा विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पिक विम्यामधील जिल्हा बँक हि नोडल एजन्सी काम करते. एखादे वेळी पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही किंवा पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करण्याच्यावेळी पिक विमा कंपनी सोबत संपर्क होत नाही, पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही, अशा वेळी शेतकरी बांधव लोकप्रतिनिधीकडे जातात किंवा जर जिल्हा बँकेच्या मार्फत विमा काढला असेल तर जिल्हा बँकेला जबाबदार धरून बँके विरोधात आंदोलन केले जाते, असे घडू नये, यासाठी पिक विमा कंपन्या सोबत कृषी विभागाने समन्वय ठेवून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा हेल्पलाईन नंबर शेतकरी बांधवाना उपलब्ध करून द्यावा. तसेच एखादी बँक जर शेतकरी बांधवाना विम्याची मंजुर रक्कम देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्या बँकेवर गुन्हा दाखल करावा असे बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर मुक्ताईनगर तालुक्यातील  कुऱ्हा वढोदा वनपरिक्षेत्रात मुक्ताई भवानी राखीव व्याघ्र संवर्धन क्षेत्र असुन यात आज घडीला आठ पट्टेदार वाघांची नोंद आहे. या परिक्षेत्रातील डोलरखेडा गावाच्या क्षेत्रात वाघांचा मुक्त अधिवास आढळून आलेला आहे. या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे. तसेच या भागासाठी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजने अंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असुन त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. तसेच डोलरखेडा गावाचे पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घ्यावा व या राखीव वन परिक्षेत्राला कुंपण करावे अशी मागणी केली.

तसेच जून जुलै महिन्यात झालेल्या वादळामुळे जे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई बाबत चर्चा सुरू असताना या वादळात घरांचीजी पडझड झाली त्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही असे निदर्शनास आणून दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे ,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हयातील आमदार, खासदार व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, व अधिकारी उपस्थित होते.

Protected Content