यावल भूमी अभिलेख उपअधिक्षकपदी मुकुल तोलावार

यावल,  प्रतिनिधी  ।  येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयास अखेर अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज नियमित उपअधिक्षक म्हणून मुकुल तोलावार यांनी  कार्यभार हाती घेतला आहे. 

 

मागील अनेक वर्षापासून यावल भूमी अभिलेख कार्यालयात कायमचे उपअधिक्षक नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांना आपल्या विविध कामानिमित्ताने वारंवार कार्यालयाचे हेलपाटे घालून देखील त्यांचे काम होत नव्हते. मात्र तत्काकालीन उपअधिक्षक ए. आर. जगताप यांच्याकडे रावेर, मुक्ताईनगर आणि  यावल असे पदभार सोपविण्यात आले होते. असे असतांना ही तत्कालीन उपअधिक्षक जगताप यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. मात्र ए. आर. जगताप यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वर्धा येथील मुकुल व्ही. तोलावार यांनी यावल तालुका भूमि अभिलेख कार्यालयाच्या उप अधिक्षकपदाची सुत्रे आज दि. ३० ऑगस्टपासून हाती घेतली. यावल तालुक्यास ८४ गावे जोडली गेली असून, यात फैजपुर शहराचा देखील समावेश आहे. तेव्हा या कार्यालया अंतर्गत कामांना शिस्त लागुन कार्यालयात येणाऱ्या नागरीकांच्या कामास आता गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Protected Content