यावल तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे ६ कोटींचे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात रविवारी मान्सुन पुर्वी वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. पिक विम्यातुन बाधीत शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी तालुका कृषी विभाग आणी महसुल विभागाच्या वतीने पंचनाम्याच्या कामास वेगाने करण्यास सुरुवात झाली आहे. यात ६६६ शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे सुमारे सहा कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यावल तालुक्यात रविवारी ४ जुन रोजी दुपारच्या सुमारास आलेल्या मानसुन पुर्वीच्या वादळीवाऱ्यासह आलेल्या गारपीट वादळी अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल करण्यात आला. ३३ टक्केच्या वरील बाधीत क्षेत्र यावल महसुल केळी लागवड क्षेत्र १८५६ हेक्टर , बाधीत क्षेत्र १०८ हेक्टर , बाधीत शेतकरी ९९ ,महसुल क्षेत्र भालोद पिक केळी लागवड क्षेत्र १९१० यातील बाधीत क्षेत्र ८१ हेक्टर बाधित शेतकरी ११o, बामणोद महसूल क्षेत्र केळी लागवड क्षेत्र ३५५हेक्टर, बाधीत क्षेत्र ६८ हेक्टर , महसुल फैजपुर मंडळ केळी लागवड १८८१यातील बाधीत क्षेत्र १५९ हेक्टर , बाधीत शेतकरी संख्या २२०, किनगाव महसुल मंडळ केळी लागवड क्षेत्र ४५५ , बाधीत क्षेत्र ५५ हेक्टर असुन एकुण ६१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे साकळी महसुल मंडळ क्षेत्रात केळी लागवड क्षेत्र ५११ हेक्टर असुन ७० हेक्टर क्षेत्र हे वादळी अवकाळी पावसात बाधीत झाले असुन यात८७ शेकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे . संपुर्ण तालुक्यातील सहा गावांचे वादळी पावसामुळे व वाऱ्यामुळे ६९६८ लागवड क्षेत्रा पैवकी नुकसान झालेले क्षेत्र ५४१ हेक्टर असुव, बाधीत शेतकऱ्यांची संख्या ६६६ ईतकी आहे . सुमारे सहा कोटीच्या वर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग यावल तालुका यांच्या वतीने या संदर्भातील प् नुकसानीचा प्राथमिक अहवाल यावलच्या तहसील मोहनमाला नाझीरकर यांना पाठविण्यात आला आहे . याबाबत यावल तालुका प्रभारी कृषी एस. ए. खैरनार , मंडळ कृषी अधिकारी पि.आर कोळी यांनी दिलेल्या माहितीत शेतकऱ्यांना सावधान राहण्याचे आवाहन केले असुन , कृषी विभाग आणी महसुल प्रशासनाने केलेला नुकसानीचा पंचनामा ग्राहय धरला जाणार असल्याचे म्हटले आहे .

Protected Content