मुक्ताईनगर तहसील कार्यायालयात मतदान कार्ड जोडणी प्रक्रियेबाबत बैठक

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या निर्देशनानुसार मतदान कार्ड आणि आधार कार्ड जोडणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आलेी आहे. या अनुषंगाने मुक्ताईनगर तहसीलदार यांनी बैठक घेवून आधार कार्ड जोडणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मतदाराची मतदान कार्डला आधार कार्ड जोडणी करावयाचे आहे, तरी आयोगाने दिलेल्या आदेशानुसार 1 ऑगस्टपासुन आधार कार्ड जोडणी कार्यक्रम सुरु झाला आहे.

मुक्ताईनगर विधानसभा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तहसीलदार श्वेता संचेती यांनी 2 ऑगस्ट रोजी मतदारसंघातील राजकीय पक्षचे पदाधिकारी, पत्रकार, कॉलेजचे ब्रँड अँबेसिटर यांचे उपस्थितीमध्ये निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी बैठक घेतली. बैठकीत नायब तहसीलदार झांबरे यांनी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार यांना आयोगाच्या आदेशानुसार सुरू झालेल्या आधार कार्ड जोडणी कार्यक्रमाची माहिती दिली. सर्वानी आपल्या भागातील बीएलए यांच्यामार्फत BLO किंवा आपल्या स्वत:च्या मोबाईल वर http://www.nvsp.in / voter helpline apps द्वारे आधार कार्ड आपल्या मतदान कार्डशी जोडणी करावयाची आहे.

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र हिवराळे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख प्रफुल पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव ,काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे तालुकाप्रमुख निलेश भालेराव, एडवोकेट राहुल पाटील ,काँग्रेसचे ओबीसी सेलचे निखिल चौधरी, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत टोंगे ,खडसे कॉलेजचे ब्रँड आंबेसेटर संदेश जवरे ,एस एम कॉलेजचे ब्रँड अँबेसेडर रोहन मेढे यांची उपस्थिती होती.

बीएलएमार्फत बीएललो यांनी तसेच कॉलेजचे विद्यार्थी यांनी महाविद्यालयामधील विद्यार्थी विद्यार्थिनींचे तसेच आपल्या परिसरातील कुटुंबातील सर्वांचे मतदान कार्ड आधार कार्डशी संलग्न करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

 

Protected Content